E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
पुणे : सदाशिव पेठेतील पेरूगेटजवळ असलेल्या भावे हायस्कूलजवळ चहाच्या हॉटेलसमोर थांबलेल्या बारा जणांना भरधाव मोटारीने धडक देणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अटक करण्यात आलेल्या चालकाला वाहन चालवता येत नव्हते. तसेच, त्याने मद्यपान केले असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
जयराम शिवाजी मुळे (वय २७, बिबवेवाडी, मूळ रा. मुळज ता. उमरगा, धाराशिव) असे कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. अपघातावेळी मोटारीत असलेले सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७) आणि मोटारमालक दिगंबर शिंदे (वय २७) यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस बजावून त्यांना सोडून देण्यात आले आहे. अपघातानंतर पोलिसांनी शनिवारी मुळेसह गोसावी आणि शिंदेला ताब्यात घेतले होते. त्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून, मुळेवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोरून छत्रपती राजाराम मंडळाकडे जाणार्या गल्लीत चहाचे हॉटेल आहे. तेथे शनिवारी (३१ मे) सायंकाळी चहा प्यायला थांबलेल्या १२ जणांना भरधाव मोटारीने धडक दिली होती. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहोत. तर इतरांना उपचार घरी पाठविण्यात आले आहे.
आरोपीमुळे याने मद्यपान करून मोटार चालवत १२ जणांना उडविले. यामध्ये, बाराही जण जखमी झाले असून, काही जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. त्यातील काहींची रविवारी परिक्षा होती. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने मुळे याला न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. पोलिस उपनिरीक्षक गणेश फडतडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Related
Articles
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
15 Jun 2025
पक्ष फुटला याची चिंता नको
11 Jun 2025
महाराणी येसूबाई, ताराबाई, छत्रपती शाहू महाराज समाधीसह किल्ले अजिंक्यताराचे होणार संवर्धन
13 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक